विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पाहावे, शिक्षण हीच खरी ताकद

Foto

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): शिक्षण ही तुमची आमची खरी ताकद आहे. त्यामुळे सर्वांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे. आताच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोई सुविधा मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. मोठे स्वप्न पाहिले तर तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.
खडकेश्वर येथील राजस्थानी वसतीगृहाच्या वातानुकूलित अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन मंगळवारी (दि.२२) विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर तापडिया, संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप चितलांगे, सचिव अनिल सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जी. श्रीकांत म्हणाले, येथे आल्यानंतर मला माझे होस्टेलमधील दिवस आठवले. मी ग्रामीण भागातील रहिवासी, घरात
राजस्थानी वसतिगृह अभ्यासिका कक्षाचे थाटात उद्घाटन
टीसी ते विभागीय आयुक्त...
दहावी झाल्यानंतर मला रेल्वेत टीसीची नोकरी मिळाली. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मला नोकरी पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता, नोकरी करीत मी बी. कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले. एकदा रेल्वेत काही कार्यकर्ते गोंधळ घालत होते. मी त्यांना समजावण्यास गेलो असता ते म्हणाले, तु टीसी आहेस, कलेक्टर नाहीस, असे म्हणत माझ्याशी अरेरावी केली. त्यावेळी मी ठरवले की आपण कलेक्टर व्हायचे. मी दिल्लीला अभ्यासासाठी गेलो. तिथे दोन विद्यार्थ्यांसाठी एक छोटी रूम होती. अशा अडचणीत मी आयएएस झालो.
आईवडील दोन भाऊ एक बहिण असे कुटुंब. घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे आम्हा तिघांनाही चांगले शिक्षण देणे वडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे वडिलांनी मला शिक्षणासाठी बाहेरगावी वसतीगृहात पाठविण्याचा निर्णय घेतला. वसतिगृहाचे वॉर्डन अतिशय शिस्तीचे होते. ते आमच्या अभ्यासावर कडक लक्ष ठेवत असत. एकदा असाच वाद झाला अन् वार्डनला मी दगड मारला. त्यानंतर मी वसतीगृह सोडून घरी परतलो. पुन्हा शिकायचे नाही असे ठरवले. मात्र आई वडिलांनी समजूत काढली
अन दुसऱ्या वसतीगृहाल पाठविले. तिथे अतिशय दुरावस्था होती, सोई सुविधा अपुऱ्या होत्या. तरीही आम्ही जिद्दीने अभ्यास केलाच. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप चितलांगे यांनी केले. ते म्हणाले, १९९९ साली जुगलकिशोर तापडिया, मी आणि समाजबांधवांनी हे वसतीगृह सुरू केले. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते वसतीगृहाचे उ‌द्घाटन केले. त्यानंतर या वसतीगृहाला सोई सुविधा पुरवल्या. आज नव्याने ७० विद्यार्थ्यांसाठी
वातानुकूलित अभ्यासिका कक्ष उभारण्यात आला. येथे वायफाय, लॅपटॉपसाठी पॉईंट व अन्य सुविधा आहेत. या वसतिगृहाने आतापर्यंत अनेक डॉक्टर, इंजिनिअर, नामवंत वकील तयार केले. मात्र आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी निर्माण झाला नाही, आता तो तयार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी
प्र.से.
नगर
खडकेश्वर येथील राजस्थानी वसतीगृहाच्या वातानुकूलित अभ्यासिका कक्षाचे उ‌द्घाटन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या छायाचित्रात जी. श्रीकांत यांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर तापडिया व कार्याध्यक्ष दिलीप चितलांगे, सचिव अनिल सोनी. (छाया: सचिन भंडारे)
व्यक्त केली. जी. श्रीकांत यांचा दाखला देत त्यांनी जीवनात नम्रता स्विकारली अन ते मोठे अधिकारी झाले. टीसी असताना त्यांनी कार्यकर्त्यांशी वाद घालून तक्रारी केल्या असत्या तर ते आयएएस झाले नसते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जी. श्रीकांत यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
कार्यक्रमाला सुनिल बलदवा, राजकुमार अग्रवाल, सुशिल भारूका, मिकमचंद मलजी, शिरीष कोरावार, अॅड, गौतम संचेती, सौ. पद्मजा तापडीया, प्रेरणा चांडक, संगिता बलदवा, अयोध्या सोनी, सायरा संचेती, सचिन करवा, श्रीकांत मनियार यांच्यासह विद्यार्थी व असंख्य नागरिक उपस्थित होते.